Wednesday, 12 October 2016
Tuesday, 11 October 2016
Navratri poem
नवरात्रीचे नऊ दिवस
देवी आली माझ्याजवळ
आणि म्हणाली सरळ सरळ...
सगळ्यांच्यात आणते समता बंधुता
विविध प्रांत भाषात जपते एकता
तीच ग मी भारतमाता!
नको मला फुल अन पान
स्वातंत्र्य जपा, हाच माझा मान!
काळ्याशार मातीला दिलं पावसानं दान
त्या शक्तीतून उगवलं सृजनाचा पान
हिरव्यागार शेताशी वारा घेई झोंबी
हळूच हसे त्यातूनच कणसाची एक ओंबी
त्या नव्या अंकुरातच ओतलाय मी सर्व प्राण!
घोंगावतो वारा तसा खळाळतो झरा
देई जीवन सर्वांना, श्वास पृथ्वीचा हा खरा
पाहिला ना तुम्ही, कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी
मोल पाण्याचे जाणा हो,तहानली अवघी सृष्टी
जल ऊर्जेचा हो स्रोत, असू द्यावे नित्य भान!
नाही मी हो मंदिरात, आहे मी दाण्यादाण्यात
राबण्याऱ्या शेतकऱ्याच्या आनंदात आणि घामात
अन्नाच्याच उर्जेवर समस्त जीवन हे चाले
तुम्हा सर्वांसाठीच रूप अन्नपूर्णेचे मी ल्याले
आदराने सेवा अन्न,करण्या तृप्त पंचप्राण!
आली ज्ञानाला भरती, उसळला बुद्धीचा सागर
ज्ञान वाटता वाटता झाला,सरस्वती अवतार
भीती अज्ञानाची टाका हो, साज नाविन्याचा घ्या
अक्षर अक्षरास जोडून, ध्यास शिकण्याचा हा!
तुला शारदेचा वर, थोर नशीब हे जाण!
सशक्त निसर्गाने दिला सुदृढ हा देह सारा
जप मनाचे सौन्दर्य, निर्मळ ठेव हा गाभारा
सात्विक आहार आणि ठेव निर्व्याज हे मन
लागू देऊ नको त्याला मिथ्या अहंकाराची घाण
शक्ती तुझ्यातच आहे, मला फक्त मूर्तीचाच मान!
आदिशक्ती आदिमाया तिच्या सर्व ठायी वास
नको ऐश्वर्याची रास, तिला हवा भक्तीचा सुवास
रोवली ममतेची बीजे करण्या दुष्कृतीचा नाश
एका तिथीनेच आली अन वात तेवली नवरात्र
मर्म जीवनाचे सांगून केला पुनीत प्राणिमात्र!
-क्षितिजा

Subscribe to:
Posts (Atom)